मुख्यमंत्री शिंदेंनी दिला जत तालुक्याला न्याय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यातील पाणी समस्येवर मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री शिंदेंनी दिला जत तालुक्याला न्याय

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सध्या उफाळून आला आहे. यादरम्यानचं कर्नाटकने महाराष्ट्रामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्नाटक सरकारने तुबची बबलेश्वर योजनेतून सांगली जिल्ह्यातील जत या दुष्काळी तालुक्यातील तिकोंडी तलावात पाणी सोडले आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत तालुक्यासाठी मोठी घोषणा केली आहे.

जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल दोन हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जत तालुक्यातील ग्रामस्थांची भेट घेतली. रात्री उशिरा जतमधील लोक मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आले होते. लोकांनी जत तालुक्याचा नकाशा आणला होता यावेळी नकाशावर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. तेथील नागरिकांच्या समस्या ऐकून घेत जानेवारीमध्ये आम्ही जतसाठी दोन हजार कोटींचे टेंडर काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, म्हैसाळ योजनेची व्याप्ती वाढवण्याचे काम करत आहोत. जतमधील जी ४० ते ५० गावे आहेत त्यांना पाणी मिळायला हवं. या विषयावर बाकीचे लोकं राजकारण करत असतील तर त्यांना करु द्या. त्यांच्या राजकीय आरोपांना उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन एवढंच मी सांगतोय असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

मुंबई मेट्रो-३ ने मिळवले हे नवे यश

मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !

स्वच्छता मोहिमेची CPL रंगतेय! ३५० स्वयंसेवक झाले सहभागी

महाराष्ट्रात लवकरच ‘ई-ऑफिस’ प्रणाली

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. याचा फायदा कर्नाटक सरकारने घेत तालुक्याच्या दुष्काळी भागात पाणी सोडले आहे. मात्र, तालुक्यातील जनतेने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना समस्या सांगितल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ टेंडर काढणार असल्याची घोषणा केली आहे.

Exit mobile version