महाराष्ट्राला मिळाला आणखी ७ हजार रोजगारनिर्मितीचा प्रकल्प

ट्विटरद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्राला मिळाला आणखी ७ हजार रोजगारनिर्मितीचा प्रकल्प

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात मोठ्या प्रकल्पाची घोषणा केली आहे. मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात १० हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणुकीसाठी कंपनीला जमीन वाटप पत्र सुपूर्द केले आहे. ट्विटरद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

इंडोनेशियामधील सिनार्मस पल्प अँड पेपर या कंपनीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जमीन वाटप पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यासाठी तीनशे हेक्टर आणि दुसऱ्या टप्पयासाठी ६०० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे राज्यात सात हजार रोजगार निर्माण होणार आहेत. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रालयात झालेल्या या समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.

यावेळी उदय सामंत यांनी राज्याला आश्वासन दिले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेले सर्व प्रस्ताव आम्ही निकाली काढत आहोत. महाराष्ट्रात येणाऱ्या गुंतवणूकदारांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे.

हे ही वाचा : 

रेल्वे प्रवासी महिलेला दगडामुळे गमवावा लागला डोळा

जिओची मोबाईल सेवा ठप्प; इंटरनेट मात्र सुरु

उत्तर प्रदेशात मदरशातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद

IFFI ज्युरी प्रमुखांची ‘द काश्मीर फाईल्स’वर टीका, राजदूतांनी मागितली भारताची माफी

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उदय सामंत यांनी रिफायनरी प्रकल्पाची घोषणा केली होती. मेगा रिफायनरी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे होणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ६ हजार २०० एकर जमिनीची आवश्यकता असून, त्यापैकी २ हजार ९०० एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.

Exit mobile version