एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा येण्यासाठी शिवसेनेच्या बाजूने न्याय दिला आहे. हा निकाल आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबाजूने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या बाजूचे वकील उत्सव त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी उद्धव ठाकरे यांना ५ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी पार्कवर वार्षिक दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि कमल खता यांच्या खंडपीठाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. देसाई यांनी मुंबई महापालिकेच्या परवानगी नाकारण्याच्या आदेशाला आव्हान दिले.

कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा सांगून छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाला बीएमसीने परवानगी नाकारली होती.

हे ही वाचा:

ठाकरे, शिंदे समर्थक धारावीत भिडले, तीन शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना करता येणार नोकरी

अमेरिका का म्हणतोय UNSC मध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व द्या?

… आणि पंतप्रधान मोदींनी परभणीच्या चिमुरडीला पाठवलं पत्र

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असल्याने परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे सर्वोच्च न्यायालयात खरी शिवसेना ही शिंदे यांची असल्याचे सांगितले जाईल, असेही ते म्हणाले.

Exit mobile version