“शिवसेनेचे नेते हे गुंडगिरी करत कामात अडथळा आणत आहेत.” असं सांगणारं खरमरीत पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे राष्ट्रीय महामार्गाची कामं बंद पडतील, असा इशाराच मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलंय.
गडकरींच्या या पत्रावरून आता भाजपा नेतेही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही या विषयावर ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याबाबत परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला केलाय. मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची वाट लावली. कार्यकर्ते रस्ते आणि महामार्गाचे लावतायत.” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अडथळे आणत असल्याबाबत परिवहन मंत्री @nitin_gadkari
यांनी मुख्यमंत्र्यांकडे संताप व्यक्त केला केलाय.मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची वाट लावली. कार्यकर्ते रस्ते आणि महामार्गाचे लावतायत.https://t.co/UnCX3xLFychttps://t.co/f6cM0AGFQM
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 14, 2021
गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय रस्ते विकासाची कामं रखडली आहेत. मी माहिती घेतल्यावर स्थानिक शिवसेना प्रतिनिधींनी ही काम थांबवली असल्याचं मला कळलं, असंही गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच स्थानिक नेत्यांचे जर असेच प्रकार सुरु राहिले तर महाराष्ट्रात रस्त्यांच्या कामांना नविन मंजुरी देण्याबाबत परत विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा गडकरींनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
पुढे पत्रात गडकरींनी आणखी स्फोटक मुद्दा मांडला आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदार हैराण झाले आहेत. मागण्या पुर्ण न केल्याने काम बंद पाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे, असं उद्विग्न आणि आक्रमक भावनाही गडकरींनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या आहेत.
हे ही वाचा:
आता डिजिटल माध्यमे येणार या संस्थेच्या कक्षेत
महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या गुंडगिरीचा अडसर
अखंड भारत संकल्पदिनाला मोदींनी केले ‘हे’ ट्विट
ही कामे बंद केली तरी आपण लोकांच्या दृष्टीने अपराधी ठरु. तसे झाले तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामे पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.