35 C
Mumbai
Saturday, November 2, 2024
घरराजकारणकॅव्हिडिओलॉजिस्ट ठाकरेंची टास्क फोर्स सोबत बैठक

कॅव्हिडिओलॉजिस्ट ठाकरेंची टास्क फोर्स सोबत बैठक

Google News Follow

Related

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉक्टरांना गृह विलगीकरणात रुग्णांच्या उपचाराचं शिवधनुष्य उचलावं असं आवाहन केलंय. तसंच आपल्याला आता कोविड विरुद्धच्या लढाईतील सैन्याचा विस्तार करायचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरवर ठेवतात. त्या माझा डॉक्टरांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या योग्यवेळी, योग्य उपचाराचे शिवधनुष्य उचलावं, असं मुख्यमंत्री म्हणाले

अजूनही हमखास औषध आपल्याकडे नाही. मात्र मागच्यावर्षीच्या तुलनेत आताच्या स्थितीची तुलना केली तर असं लक्षात येतं की, कोविडच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांमध्ये, सर्वसामान्य माणसांच्या मनात कोविडची प्रचंड दहशत होती. आपल्याला हे कोविडचे युद्ध किती मोठे आणि भयानक आहे हे जाणवू लागले होते. आपण यावर न डगमगता पाऊले टाकली. कोविड विरुध्दची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी “माझा डॉक्टर” म्हणून ज्यांची ओळख आहे त्या फॅमिली डॉक्टरांनी शासनासोबत यावे, कुटुंब प्रमुख म्हणून मी आज आपल्याला साद घालत आहे. चला, सर्वांच्या सहकार्यातून आपण करोना विषाणुचा नायनाट करूया, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना आवाहन केलंय.

आपल्या सगळ्यांना माहित आहे की जगभरात प्रत्येक घराचा एक स्वत:चा कुटुंबाचा डॉक्टर असतो. आपल्याला आपल्या त्या माझ्या डॉक्टरवर म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरवर खुप विश्वास असतो. या डॉक्टरांनाही कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची, त्याच्या प्रकृतीची संपूर्ण माहिती असते, घरातल्या लोकांचे आजार माहित असतात. आज मला तुमच्या या अनुभवाची गरज आहे, तुमच्या सहकार्याची  आणि सेवेची गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, आजही ७० ते ७५ टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत त्यांना आपण रुग्णालयात दाखल करून घेत नाहीत किंवा तसा सल्ला देत नाहीत.

हे ही वाचा:

अतुल्य भारताचा सन्मान करा, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूने मीडियाला सुनावले

अमित शहा- उद्धव ठाकरे तातडीची बैठक, तौक्ते वादळांवर चर्चा

मोदींविरोधी पोस्टर्ससाठी ‘आप’ने हाताशी धरले रिक्षावाल्यांना

मविआ नेत्यांविरोधात मराठा संघटनेचे जोडे मारो आंदोलन

त्यांचा घरच्याघरी उपचार करतो, काहीना तर औषधांची गरज न पडता ते बरे होतात. एकीकडे ही स्थिती आहे तर दुसरीकडे आपल्या लक्षात येते की मृत्यूदर वाढतो आहे, मग त्याची कारणे शोधली तर पेशंट उशिरा रुग्णालयात दाखल होतात हे कारण प्रामुख्याने समोर येते. रुग्ण घरच्या घरी अंगावर काही गोष्टी काढतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात. मला यामध्ये तुम्हा सर्वांचे सहकार्य हवे आहे. गृह विलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांचे उत्तम उपचार व्यवस्थापन होण्याची गरज यातून पुढे आल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत नमूद केलं.

एकीकडे डॉक्टर आणि नसेसचे आंदोलन सुरु असताना उद्धव ठाकरेंची ही मागणी कोड्यात टाकणारी आहे.

गोरेगावमधील नेस्को कोवीड सेंटरमध्ये कोरोना योद्ध्यांनीच आंदोलन पुकारले आहे. कोवीड उपचारांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या योद्ध्यांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध होत नसल्यामुळे आपल्या हक्कांसाठी या योद्ध्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रविवार, ९ मे रोजी गोरेगावच्या नेस्को कोवीड सेंटरमधील सगळ्या डॉक्टर्स, नर्सेसनी संप पुकारला.

देशात सध्या कोरोनाचे तांडव सुरु असून यात महाराष्ट्र होरपळून निघत आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. राज्याला या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य व्यवस्थेशी संबंधित इतर कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. पण राज्यातील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे त्यांच्यावर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करायची वेळ आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा