महाराष्ट्रात सध्या कोविडचा हाहाकार चालू आहे, परंतु मुख्यमंत्री मात्र गायब आहेत. त्यांनी एकदाच काही घोषणा केल्यानंतर ते गायब झाले आहेत यावरून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यावर भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील सरकारला टोला लगावला आहेच, परंतु प्रकाश आंबेडकरांना देखील कोपरखळी मारली आहे.
नेमके काय घडले?
महाराष्ट्राची परिस्थिती बिकट झालेली असताना मुख्यमंत्री मात्र गायब झाले आहेत. याऊलट अजित पवार हेच मुख्यमंत्री वाटतात असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यावर “अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील अंबेडकर यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
भारतीय जेम्स बॉण्ड, अजित डोवाल मुत्सद्देगिरीतसुद्धा भारी
वर्तकनगरातील वेदांत हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी चार रुग्ण दगावले
नैसर्गिक वायूनिर्मिती वायूवेगाने
‘या’ चार राज्यांमध्ये १ मेपासून तरुणांना लस नाहीच
या सर्वांवरून अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री आणि खुद्द प्रकाश आंबेडकर दोघांवरही एकत्र निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीट मध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की,
मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे.
मुख्यमंत्री मिस्टर इंडियाचे गॅझेट घालून अदृश्य झाले आहेत. ते बहुधा कोरोना आटोपल्यावरच प्रकट होतील. अर्थात ही बाब प्रकाश आंबेडकरांच्या फार उशीरा लक्षात आल्याचे दिसते आहे.https://t.co/fZJLlcpaEhhttps://t.co/AD8KudQmCe
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 26, 2021
त्यामुळे या ट्वीटमधून भातखळकरांनी दोघांनाही टोला लगावल्याचे दिसत आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यापूर्वी देखील वेळोवेळी सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणांवरून सरकारला धारेवर धरले आहे.