गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाचं संकट आहे. राज्य सरकारही कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचंही चित्र निर्माण झालंय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कोरोनाच्या प्रादुर्भावानं उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अकोला येथील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
सध्या महाराष्ट्र शासन पूर्णपणे झोपलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांची झापड मुंबईपुरती तर उपमुख्यमंत्र्यांची झापड ही फक्त बारामतीपुरतीच असल्याचा टोला आंबेडकरांनी लगावलाय. यामुळेच उच्च न्यायालयच सर्व आदेश देत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
हे ही वाचा:
देशात ३ लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्ण
पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद
कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार
धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणावरूनही हल्लाबोल केला होता. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या पत्रकार परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली होती. नवाब मलिकांना राज्य सरकारकडून बळीचा बकरा केलं जात असल्याचं आंबेडकर म्हणाले होते.