मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क

मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क

महाराष्ट्रामध्ये कोरोनाने कहर केलेला असताना ठिकठिकाणी ऑक्सिजन बेड, अतिदक्षता विभागातील बेड पूर्ण भरले गेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आढळून येत आहे, तर संपूर्ण राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत आहे. मात्र यातून सातत्याने सरकारचे नाकर्तेपण अधोरेखित होत आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू

शिवकथाकार डाॅ.सुमंत टेकाडे यांचे निधन

चिनी दबावाविरुद्ध अमेरिका-जपानची वज्रमूठ

आम्ही न्यायासाठी लढत राहू

मुंबईत कोरोनचा विस्फोट झालेला असताना, संपूर्ण मुंबईत अतिदक्षता विभागात केवळ २३ बेड्स शिल्लक तर व्हेंटिलेटरयुक्त केवळ ५ बेड्स शिल्लक असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. वेगाने रुग्णवाढ होत असताना आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले पहायला मिळत आहेत. यावरून भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार हे मुख्यमंत्र्यांना कळते मात्र ती लाट थोपवण्यासाठी उपाययोजना करायच्या सोडून खंडणी वसुलीत गर्क असल्यामुळे आज संपूर्ण मुंबई अतिदक्षता विभागात केवळ २३ बेडस् तर व्हेंटिलेटर युक्त फक्त ५ बेड्स उपलब्ध आहेत…

मुख्यमंत्री केवळ दुसरी लाट येणार, तिसरी लाट येणार हे सांगताना दिसत आहेत. मात्र सध्याच्याच लाटेमध्ये सरकारची व्यवस्था तोकडी पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर सडकून टिका केली जात आहे.

Exit mobile version