मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत

मुख्यमंत्री केवळ बाता मारतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज देवगडमध्ये आहेत. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला. मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? असा सवाल करतानाच गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि प्रत्यक्ष टीका करत आहेत. मला राजकीय बोलायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच पण मुख्यमंत्री आले हे ठिक आहे, असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

आता दरवर्षी कोवॅक्सिनचे १ अब्ज डोस

पंचनाम्यानंतरच मदत

राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना माफ करा, स्टालिनचे राष्ट्रपतींना पत्र

कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल १७ हजारांनी घट

वादळाचा अलर्ट असतानाही देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी केला. कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार? बोटींचाही पंचनामा झालेला नाही, असं सांगतानाच अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नुकसानीचे आकडे दाखवले आहेत. तेही अत्यंत कमी आकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर जरब बसवली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version