27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणमुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांची 'आठवलेगिरी'

मुद्द्यांना बगल देत मुख्यमंत्र्यांची ‘आठवलेगिरी’

Google News Follow

Related

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर आज विधानसभेत भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अभिभाषणातून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर दोषारोपण केले. एवढच नाही तर राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीच प्रयत्न करावे असे आवाहनही केले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण हे कोटी, यमक आणि चारोळ्यांनी भरलेले होते. उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकणाऱ्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची आठवण आली नसती तरच नवल होतं. मात्र कोटी करण्याच्या आणि यमक जुळवण्याच्या नादात भारतीय सैन्याचा आणि सैनिकांचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केला. भाजपा आणि विरोधीपक्ष महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेतकऱ्यांना झालेले नुकसान या विषयांवरून सरकारला प्रश विचारात आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना मात्र महाराष्ट्रातले शेतकरी सोडून पंजाबचे आंदोलन करणारे शेतकरीच आठवत आहेत. ते असं म्हणाले की, “शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून त्यांच्या मार्गात खिळे टाकले जातायत, कुंपणं लावली जातायत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी खिळे आणि चीनसमोरून पळे.” अशा पद्धतीने गलवान खोऱ्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांचा मुख्यमंत्र्यांनी अपमान केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त ठाकरे सरकारकडून अभिवादनाचं एक साधं ट्विटही का केलं नाही? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला होता. या प्रश्नाला बगल देत, सावरकरांना अजून भारतरत्न का दिला गेला नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी अशाच पद्धतीने बगल दिली. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, ही शिवसेनेचीच जुनी मागणी आहे. परंतु स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी या मुद्द्यावर काहीच पावलं उचलली गेलेली नाहीत. आजही मुख्यमंत्र्यांनी या मुद्द्यावर काहीही उत्तर दिले नाही. उलट, औरंगाबाद विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करण्याची मागणी अजून केंद्राने का पूर्ण केलेली नाही? असा प्रश्न त्यांनी केला.

विधानसभेत भाषण करतानाचे काही नियम असतात. त्यापैकी दोन नियमांचा भंग आजच्या भाषणातून सभागृहाचे नेते असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केला. एक नियम असा आहे की सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीचे नाव घेता येत नाही, तसे घ्यायचे असल्यास त्या व्यक्तीची तशी परवानगी घ्यावी लागते. आणि दुसरं म्हणजे भाषणाच्या वेळी संसदीय भाषेचा वापर करायचा असतो. मुख्यमंत्र्यांना हे नियम माहिती असूनही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा उल्लेख केला आणि हा उल्लेख करताना त्यांनी ‘निर्लज्ज’ या शब्दाचा देखील उल्लेख केला. हा उल्लेख करताना ते स्वतःच म्हणत होते की, “हे असंसदीय आहे मला माहिती आहे पण तरीही मी हा शब्द वापरतोय.”

हे ही वाचा:

“सरकार केवळ फेसबुक लाईव्हमध्ये मग्न”

२५ वर्ष ज्या पक्षाशी युती केली त्या पक्षाची मातृ संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही उद्धव ठाकरेंनी टीका केली. उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की, तुमच्या मातृसंस्थेचेही देशाच्या स्वातंत्र्यात काहीही योगदान नव्हते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर सभागृहाबाहेर मिडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं की,”संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक होते.”

मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणातून विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, कोणतीही आकडेवारीही दिली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

2 कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा