मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र का लिहिले आहे याची आता चर्चा सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांनी हे पत्र लिहून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धतीऐवजी खुले धोरण सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील साखर कारखानदारी कोटा आधारित साखर निर्यातीच्या विरोधात असून यामुळे कारखान्यांवर मर्यादा येतील असं मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाणिज्य, ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक व्यवहार मंत्रालयाला योग्य निर्देश देण्याची विनंती केली आहे.
केंद्र सरकारने साखर निर्यातीबाबत अवलंबलेल्या खुल्या धोरणामुळे २०२१-२२ मध्ये भारत हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यात करणारा देश बनल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि परकीय चलनही वाढले. यंदापासून साखर निर्यातीसाठी कोटा पद्धत लागू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या पद्धतीमुळे आमच्या साखर कारखानदारांचे नुकसान होईल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?
रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष
मार्चपर्यंत देशातील गाळप हंगाम संपेल, असे मुख्यमंत्री म्हणतात. ब्राझीलमधील हंगाम १ एप्रिलपासून सुरू होतो आणि त्यामुळे स्पर्धा निर्माण होते ज्यामुळे साखर निर्यात करणाऱ्या इतर देशांना फायदा होतो. साखर निर्यातीसाठी सरकारने कोणतीही आर्थिक मदत देण्याची गरज नाही. पैसे कमावण्यासाठी आपला कोटा दुसऱ्यांना हस्तांतरित करण्याच्यादृष्टीने निर्यात करण्यात स्वारस्य नसलेल्या कोटा प्रणालीमुळे परवानगी मिळते असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आपण हस्तक्षेप करून वाणिज्य , ग्राहक संरक्षण आणि अन्न व सार्वजनिक मंत्रालयाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रामध्ये केली आहे.