आज आषाढी एकादशीचा राज्यभरात उत्साह आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज, १० जुलै रोजी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच महापूजा होती. अनेक वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठ्ठलाची महापूजा केली.
यंदा महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत वारकरी मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मिळाला. गेल्या २० वर्षांपासून हे दाम्पत्य वारी करत आहेत. पहाटे ३ वाजून १० मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू उपस्थित होते.
महापूजेनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यातील शेतकरी, कष्टकरी, वारकरी, समाजातील सर्व घटकांना सुख, समृद्धी मिळो. कोविड संकट कायमस्वरुपी जावं. राज्यावरील संकटं, सगळ्या अडचणी दूर होवो. राज्याची प्रगती व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा. गोरगरीब सामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न असेल.
हे ही वाचा:
डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान
एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!
गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ
शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यास राज्य निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तींवर संमती दिली. शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे पोहोचल्यानंतर शिंदे यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.