३ हजार शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत होणार दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी जय्यत तयारी सुरू

३ हजार शिवसैनिकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत होणार दाखल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री अयोध्येला रवाना होणार असून उत्तर प्रदेशातील त्यांच्या आगमनाची आणि तेथील व्यवस्थेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.  रविवारी एकनाथ शिंदे भगवान श्रीरामाची पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह त्यांचे सहभोजनही होणार आहे. अयोध्येतील या दौऱ्यासाठी तेथील अनेक हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३ हजार शिवसैनिकही अयोध्येला जाणार असून हा शिंदे यांचा दुसरा दौरा आहे. याआधी २०२०मध्येही ते महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले होते. पण यावेळी मुख्यमंत्री या नात्याने ते जात आहेत. तसेच पुढील वर्षी प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णपणे तयार होणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

शनिवारी संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे मुंबईहून लखनऊला रवाना होतील. सोबत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार, शिवसेनेचे अन्य नेतेही सहभागी होणार आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, ३००० शिवसैनिक आधीच अयोध्येकडे रवाना झाले आहेत. रात्री लखनऊला थांबल्यानंतर शिंदे आपल्या नेत्यांसह अयोध्येला हेलिकॉप्टरने जातील. तिथे ते प्रभू श्रीरामाची आरती करतील आणि मग श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्याचा आढावाही घेतील.

हे ही वाचा:

ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करण्यापूर्वी केला पत्नीवर प्राणघातक हल्ला

‘१५ कोटी रुपयांसाठी केजरीवाल १५ कोटींचे तूप असा शब्द वापरतात’

कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा

भिंद्रनवालेप्रमाणे दिसण्यासाठी अमृतपालने केली होती शस्त्रक्रिया

हेगडे यांनी सांगितले की, त्यानंतर शिंदे हे लक्ष्मण किला येथे जाणार असून तेथे संत महंतांचे दर्शन करतील. मग शरयू नदीवर ते आरती करणार आहेत. मग रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जाऊन तिथे त्यांच्यासह ते सहभोजन करणार आहेत. मग मध्यरात्री मुंबईच्या दिशेने त्यांचे प्रयाण होईल.

महाराष्ट्रातून मंत्री गिरीश महाजन आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष तसेच आमदार आशीष शेलार हे या दौऱ्याच्या तयारीत सहकार्य करणार आहेत.

प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यात दरवाजे, खिडक्या, गर्भगृहाचे प्रवेशद्वार यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून सागवानी लाकूड पाठविण्यात आलेले आहे. यानंतरही अशा मूल्यवान लाकडाची पाठवणी मंदिर निर्माणासाठी केली जाणार आहे.

 

असा असेल कार्यक्रम-

 

शनिवारी मुंबई ते लखनऊ प्रवास

मग अयोध्येला प्रयाण

रविवारी प्रभू श्रीरामाचे दर्शन आणि महाआरती

प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्याची पाहणी

लक्ष्मण किलाला भेट

शरयू नदीवर आरती

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सहभोजन

Exit mobile version