एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले. शिंदे सरकार सत्तेत आले आणि राज्यात कामाला वेग आला. येथून पुढे शेतकऱ्यांची आत्महत्या होऊ देणार नाही आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. गोव्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, जलयुक्त शिवार आणि मेट्रो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
राज्याला पुढे नेण्यासाठी जे कर्तव्य लागेल, ते सर्व मी पूर्ण करेल. शेतकऱ्यांच्या समस्येवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
“सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला ठाकरेंना पाहवत नाही”
उस्मानाबादच्या नामकरणावरून राष्ट्रवादीच्या ४० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात
१२ जुलैला पंतप्रधान मोदी झारखंड दौऱ्यावर
अडीच वर्षात रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार. राज्याच्या विकासासाठी, जनतेसाठी काम करणार आहे. शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी मिळून राज्याच्या विकास करणार. तसेच पैशाचा गैरवापरही करणार नाही, असाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सध्या आमच्यासोबत १७० आमदार आहेत. अजूनही आमदार वाढणार आहेत. शिवाय सगळे आमदार उद्या मुंबईला परत येणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.