मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, ७ जुलै रोजी म्हणजेच आज मुख्यमंत्री पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवण्यात आली होती. पहाटेपासून या पूजेसाठी जय्यत तयारी सुरु होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मोठा उत्साह दिसून आला. त्यांचे स्वागत करण्यासाठी समर्थक आमदार, पदाधिकारी, अधिकारी यांची गर्दी झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला.
मंत्रालयात आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. pic.twitter.com/RYx4aOz9qE
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 7, 2022
मंत्रालयात आगमन केल्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील दालनासमोर मुख्यमंत्र्यांचे औक्षण केलं. मुख्यमंत्री शिंदेंच्या दालनात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला आहे. कार्यभार स्वीकारल्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित सचिवांशी चर्चा केली. सर्व घटकांना सोबत घेऊन गतिमान पद्धतीने कारभार करण्यावर भर देण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक
उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
पवईतील हिरानंदानी मॉलमध्ये भीषण आग
महाराष्ट्रासारखा राजकीय भूकंप इंग्लंडमध्ये, जॉन्सन सरकारमधील ३९ मंत्र्यांचा राजीनामा
यावेळी सदा सरवणकर म्हणाले की, मुख्यमंत्री आज मंत्रालयातील कार्यालयाचा पदभार स्वीकारणार आहेत. आम्हाला याचा आनंद आहे. सर्वांना बोलवण्यात आलं आहे. त्यापैकी ज्यांना शक्य आहेत ते येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या कॅबिनमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धर्मवीर आनंद दीघे यांची प्रतिमा आहे.