फोटो काढण्यासाठी लोकांनी जवळ तर यायला हवं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

फोटो काढण्यासाठी लोकांनी जवळ तर यायला हवं?

माझ्यामुळे इतर लोकांना आणि टिकाकारांना पुण्य मिळत आहे. आपले आकाशाला हात कधीच टेकणार नाहीत, आपण जमिनीवरच आहोत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

दहीहंडीनंतर राज्यात गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा झाला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध गणेश मंडळांना भेट दिली. अनेक मान्यवरांच्या नेतेमंडळींच्या गणपती बाप्पाचे दर्शन त्यांनी घेतले. आजच्या विसर्जनाच्या दिवशीही मुख्यमंत्री शिंदे गणपती दर्शनासाठी दौऱ्यावर होते.

गणेशोत्सव काळात रोज मुख्यमंत्री शिंदे विविध ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेत असताना, विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून गणेश मंडळांना दिलेल्या माझ्या भेटींनी सगळीकडे मोठा उत्साह होता. मी गणपतीचे दर्शन घ्यायला फिरायला लागल्यापासून अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यामुळे त्यांना पुण्य देखील माझ्यामुळेच मिळत आहे त्यामुंळे त्यांनी ते पुण्य घ्यावं, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

टेंभीनाका परिसरातील जय माँ सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आज मंडप पूजनाचा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

हे ही वाचा:

चीनचे सैनिक या भागातून चाललेत मागे

राणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा दुखवटा

याकुब मेमन कबर प्रकरणात मुख्यमंत्री काय म्हणाले?

७० वर्षांच्या काळात १८ भारतीय पंतप्रधानांना भेटल्या राणी एलिझाबेथ

गणेशोत्सव काळात गणपतीचे दर्शन घेतानाचे मुख्यमंत्रांचे फोटो वायरल झाले होते. यावरूनसुद्धा विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली होती. यावर शिंदे म्हणाले, नागरिकांचं स्वागत स्वीकरण्यासाठी लोकांमध्ये जातो. तेव्हा लोकं फोटो काढतात, त्यावेळी फोटो काढण्यासाठी गेले अशी टीका केली. पण फोटो काढण्यासाठीपण लोकं जवळ यायला लागतात ना, प्रेमाने लोकांना जवळ घ्यावेही लागते, कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. टीका करायची नाही, या सगळ्यांना कामातून उत्तर देऊ. गणराय या सगळ्यांना सद्बुद्धी येवो, अशी प्रार्थना करतो, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Exit mobile version