एकनाथ शिंदेची संजय राऊतांवर टीका
खासदार संजय राऊत हे राज्यात सत्तांतर होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या या पोकळ दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सत्तांतराचे स्वप्न त्यांना पाहू द्या, शिंदे फडणवीस सरकार भक्कम आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. शिवसेनेचे नेते लीलाधर डाके यांची सदिच्छा भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लीलाधर डाके यांनी शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मोठं योगदान दिलं आहे. बाळासाहेबांच्या बरोबर जे सुरुवातीला नेते होते, त्यात डाके साहेबांनी महत्वाचं काम केलं आहे. आनंद दिघे यांच्यासोबत सुद्धा डाके यांचे स्नेहाचे संबंध होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत डाके यांनी शिवसेना वाढीचं काम केलं आहे. त्यांनी स्वतःसाठी काही निर्माण केलं नाही जे केलं ते बाळासाहेबांसाठी, शिवसेनेसाठी केलं आहे. अशा सर्व नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली आहे, म्हणून अशा सर्व नेत्यांच्या मी भेट घेणार आहे. एक कार्यकर्ता म्हणून मी डाके यांची भेट घेतली असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यांच्या तब्येतीची शिंदे यांनी विचारपूस केली आहे.
संध्याकाळी मुख्यमंत्री शिंदे मनोहर जोशी यांचीसुद्धा भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज्याचा विकास होण्यासाठी जेष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी जेष्ठ नेत्यांची भेट घेत असल्याची, शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
ED ला बळ, मनी लाँडरींगवाल्यांच्या पोटात कळ…
शिंदे-फडणवीस सरकार येताच बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर
अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून आतापर्यंत मिळाले ५० कोटी
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण नको; उच्च न्यायालयात १ ऑगस्टला सुनावणी
मंत्री मंडळाच्या विस्तारावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यापासून, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. दुष्काळग्रस्त भागात पाणी वळवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार नसतानाही सरकारचे काम कुठेही थांबू दिलेलं नाही. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.