अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये असा जोरदार टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री तीन दिवसांच्या सुट्टीवर आपल्या गावी गेलेलं आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीवरून आता विरोधक टीका करत आहेत. बारसूमध्ये आंदोलन पेटलेले असतांना मुख्यमंत्री सुटीवर गेल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुट्टीवर की संपावर?, अशी टीका सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. विरोधकांच्या या टीकेला उत्तर देतांना मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत. सत्तांतरानंतर सातत्याने ककमत व्यस्त असलेले मुख्यमंत्री सत्तांतरानंतर पहिल्यांदाच दोन दिवसांपासून आपल्या मूळ गावी दरे तांब येथे मुक्कामी आले आहेत. पण तरीही तेथे हजारो नागरिकांना भेट आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सुट्टीवरून विरोधक करत असलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले , गेल्या दोन दिवसांपासून मी माझ्या गावी आलो आहे. येथे येऊनही मला भेटण्यासाठी हजारो लोक येत आहेत. त्यांच्या समस्या मी ऐकून घेत आहे. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. अधिकाऱ्यांच्या काही बैठकाही मी घेवून काही प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच माझ्या परिसरात पर्यटनवाढीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची मी पाहणी केली आहे.
मी माझ्या गावी आलो याच्यावरुन विरोधक टीक करत असतील तर ते गैर आहे. मी सुट्टी घेतलेली नाही तर अनेकांना कायमचे सुट्टीवर पाठवलेले आहे .बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलू नये. माझ्याकडेही बोलण्यासारखे खूप शब्द आहेत. अडीच वर्षे घरी बसणाऱ्यांनी बोलू नये असा अप्रत्यक्ष टोला मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
हे ही वाचा:
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश
आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता
गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू
गेल्या सहा महिन्यांपासून भाजप सेना युती म्हणून आम्ही काम करत आहोत. असंख्य प्रश्न, समस्या मार्गी लावल्या आहेत. लावत आहोत. सहा महिन्यात आम्ही एवढे काम केले आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हीच म्हणजे आमची भाजप सेना युती निवडणूक जिंकेल व आम्ही पुन्हा सत्तेत असू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.