26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणसावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सावरकरांच्या टीकाकारांवर जोरदार हल्ला

Google News Follow

Related

काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी वारंवार करत आहेत. काँग्रेसने जणू काही बदनामीची मोहीमच उघडली आहे. असा जोरदार हल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकरांच्या टीकाकारांवर केला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर व चिरायू पंडित यांनी इंग्रजी भाषेत लिहिलेल्या ‘द मॅन व्हू कुड प्रिव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे उदय निरगुडकर यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ‘वीर सावरकर : फाळणी रोखण्याची क्षमता असलेला महापुरुष’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्रीशिंदे बोलत होते.

या कार्यक्रमाला व्यासपीठावर खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, आमदार सदा सरवणकर, पुस्तकाचे मूळ लेखक तथा केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहुरकर, लेखक उदय निरगुडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर उपस्थित होते.

आपल्या भाषणात हल्ला चढवतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले , स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल किती बोललो तरी, ते कमीच आहे. कारण त्यांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती, त्यांचं बलिदान, त्यांचा त्याग हे आपण कुठल्याही शब्दांमध्ये सांगू शकत नाही. त्यांचं वर्णन शब्दाच्या पलीकडचे आहे. त्यामुळेच काही लोक जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांची नाहक बदनामी वारंवार करत आहेत. काँग्रेसने जणू काही बदनामीची मोहीमच उघडली आहे. संधी मिळेल तिथे या देशभक्ताचा आणि राष्ट्रभक्ताचा अपमान करण्याचे पाप करत आहेत. अशा परिस्थितीत पुस्तक प्रकाशित होणे प्रशंसनीय असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल  केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर, उदय निरगुडकर यांचे आभार व्यक्त केले.

हे ही वाचा:

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठा

सरकारमुळेच देशाची फाळणी झाली, असा गैरसमज काँग्रेस पक्ष पसरवत आहे. हे पुस्तक त्याला पुराव्यावर आधारित उत्तर आहे. त्यामुळे नव्या पिढीला सावरकर समजावून घ्यायचे असतील तर प्रत्येकाने पुस्तक हे पुस्तक वाचले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी काही माणसे इतिहास घडवतात आणि काही माणसे इतिहास पळवतात. काँग्रेसने नागरिकांना इतिहासाची केवळ एकच बाजू दाखवली. परंतु २०१४ साली या देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिंदुत्वाचं देखील जागरण सुरू झालं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील ‘गर्व से कौन हिंदू है’ हा नारा देण्याचे धाडस केले होते”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा