आज महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. जनतेला त्रास होऊ नये याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. पावसाचा पूर्ण आढावा मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उपाययोजना केल्या आहेत. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
तसंच यावेळी त्यांनी मुंबईत कुठंही पाणी साचल्याच्या घटना नाहीत असा दावा केला आहे. हिंद माता जिथं पाणी साचत तिथं पाणी साचलेलं नाही. धोकादायक इमारती नागरिकांनी खाली कराव्यात. अशी सूचना त्यांनी नागरिकांना केल्या आहेत. तसंच सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्याची माहिती दिली आहे.
कोल्हापूरसह कोकणातील विविध भागात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात आढावा घेण्यात येत असून कोकणात एनडीआरएफच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुंबईतील काही पूर परिस्थिती वाटत असलेल्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आतापर्यंत ३ हजार ५०० लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेत किती संतोष बांगर उरलेत???
‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’
उद्धव ठाकरे यांचे टोमणेबॉम्ब सुरूच!
डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेचं कौतुक केले आहे. ते म्हणाले, पालिकेने योग्य नियोजन केल्याने पाणी साचल्याच्या घटना कमी घडल्या आहेत. नेहमीच्या ठिकाणीही पाणी अद्याप साचलं नाही. मुंबईत पाणी साचतं तिथं पालिकेकडून योग्य नियोजन करण्यात आलं आहे.