शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी चिखली येथील भाषणात खोके, बोके, रेडे असे संबोधत शिंदे गटावर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे यांना एकामागून एक धक्के बसल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून त्यांचं अशा प्रकारचं वक्तव्य होत आहे असा पलटवार मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे.
मला वाटलं होतं की त्यांना नैराश्य यायला वेळ लागेल. पण ते अगोदरच आलं आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्यांवरून धक्के बसत आहेत आणि त्यातून ते सावरलेले नाही. त्यातूनच ते अशी वक्तव्य करत असल्याची खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
बोक्यांना खोक्याची भूक लागली होती म्हणून तुमच्याशी आणि आमच्याशी गद्दारी करून गेले अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. या टीकेलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांचे नाव न घेता उत्तर दिले आहे. फ्रिजचं नाही तर कंटेनर भरून खोके गेले. फ्रिजमधून खोके कुठे गेलेत याचा आधी शोध घेतो मगच उत्तर देतो असा घणाघात शिंदे यांनी केला आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः च्या गिरेबानमध्ये झाकून पाहावे असेही शिंदे यांनी सुनावले आहे.
हे ही वाचा :
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
तर आयुष्यभर पाय चेपेन
खोके आणि बोके याशिवाय दुसरा विषय मांडता येतो का . उद्धव ठाकरे यांनी सर्व यंत्रणा कामाला लावून पुरावे द्यावेत. आम्ही खोका घेतल्याचा एक तरी पुरावा दाखवावा आयुष्यभर पाय चेपेन असे आव्हान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे यांना दिले आहे.