‘…म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही!’

अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचे जोरदार

‘…म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही!’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करताना जोरदार फटकेबाजी केली आहे, आपल्या भाषणात फुल्ल बॅटिंग करत त्यांनी मविआ सरकार , उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्यावर तुफान फटकेबाजी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या रेशीम बाग येथील संघ मुख्यालयाला भेट दिली होती . त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेचा समाचार घेताना शिंदे म्हणाले की प्रबोधनकार ठाकरेंचे नातू लिंबू टिंबूची भाषा करु लागले. रेशीम बागेत गेल्यानंतर अनेकांनी आम्हाला हिणवलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं काम करायचं म्हणून आम्ही रेशीम बागेत गेलो, गोविंदबागेत गेलो नाही.

अजित पवार रोखठोक भूमिका घेतात. पण, काल ते सत्याच्या बाजूनं उभे राहिले नाहीत. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे होतं, असा टोलाही लागवतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी अडीच वर्षात कोणता निर्णय घेतला असा सवाल महाविकास आघाडी सरकारला केला. अजित दादांकडून कालचे निर्णय झाले त्याचे स्वागत होईल असं वाटलं होतं. पण तुम्ही आमच्या भाषणावर किती टाळ्या झाल्या हे मोजत होते. दादांना वाटलं नव्हतं की एवढे मोठे आम्ही निर्णय घेऊ, आमच्या सरकारच्या कामाचा हा वेग त्यांनी पाहिला आहे अशी कोपऱखालीही शिंदे यांनी मारली.

शेतकऱ्यानंसुद्धा हेलिकॅप्टरनं फिरलं पाहिजे

अजित पवार याना टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणले की दादांना माहिती आहे की आम्ही घेणारे नाहीत तर देणारे आहोत. देना बँक आहे लेना बँक नाही, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही घेणारे आहात का अस सवाल अजित पवार यांना केला. विरोधकांनी मागणी केली नसताना धानाला बोनस दिला हे आमचं सरकार आहे. शेतकऱ्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. विदर्भातील शेतकरीही चांगल्या गाडीत गेला पाहिजे. शेतकऱ्यानंसुद्धा हेलिकॅप्टरनं फिरलं पाहिजे. तालुकानुसार हेलिपॅड करायचंय. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. अचानक आरोग्य, अपघात झाल्यास एअर अम्बुलन्सनं आणता येऊ शकतो.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरने आपल्या शेतात गेले होते त्यावरून विरोधकांनी खूप टीका केली होती. त्याला जोरदार उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री कसा हेलिकॉप्टरने शेतावर जातो म्हणून हिणवलं. दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाणारा दाखवा आणि बक्षिस मिळवा असं म्हटले. मी तर म्हणतो मागचे मुख्यमंत्री कधी घराबाहेर पडले हे दाखवा आणि बक्षिस मिळवा असा जोरदार टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरे याना लगावला . लोकांचे बक्षीस वाचावे म्हणून आम्ही मुख्यमंत्रीच बदलला सरकारच बदलून टाकलं आणि लोकांना मोठे बक्षीस देऊन टाकले. ते काल विदर्भाला मिळाले असेही शिंदे यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले.

Exit mobile version