राज्यातील अवकाळी पावसाच्या मुद्यावरून विरोधकांनी विधानसभेत सरकारला लक्ष्य केले. विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही आक्रमक होत सरकारवर जोरदार टीका केली. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व नियम निकष डावलून या पूर्वी देखील मदत केली आहे. आजही करत आहोत. तुम्ही काळजी करू नका. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचे सरकार आहे असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या तिसऱ्या आठवडयात अवकाळीच्या मुद्ययावरून विरोधक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले .गेल्या ८ दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. फळबागांचे नुकसान झाले. आंबा, काजू यांचे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. सरकार संवेदनशील आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे अशी टीका अजित पवार यांनी केली .
हे ही वाचा:
ऍड. पृथ्वीराज झाला यांना पोलिसांकडून मारहाण, वकिलांचे एक दिवसाचे काम बंद आंदोलन
अवघ्या ४५ दिवसांत बाजी पलटलीअदाणींचे दिवस पालटले आणि क्रेडीट स्वीसचेही…
तालिबानी घेणार भारताकडून ऑन लाईन प्रशिक्षण
भारताच्या पंतप्रधानांना शांततेचे नोबेल मिळणार का?
अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले , मी नांदेडच्या कलेक्टरशी स्वतः रात्री बोललो ते स्वत; अर्धापूर आणि मुतखेडला गेले आहेत. पंचनामे सुरु आहेत. नाशिक कलेक्टरशी बोललो तेथेही पंचनामे सुरु आहेत. या नुकसानीचा अहवाल लवकरच शासनाला प्राप्त होईल. गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जवळपास पूर्ण झालेले आहेत, असे सांगून कालपासून ज्या ठिकाणी पाऊस पडत आहे, त्या भागात देखील पंचनामे सुरु आहेत . नियम, निकष डावलून यापूर्वी शेतकऱ्यांना मदत केली आहे, आजही आपण मदत करीत असून हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.