महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो महाराष्ट्राला का मिळू शकला नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

‘वेदांता- फॉक्सकॉन’ कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर विरोधकांकडून नव्या शिंदे- फडणवीस सरकारवर आरोपप्रत्यारोप होत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेदांता आणि फॉक्सकॉन यांचा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प अचानक गुजरातला कसा गेला, तो महाराष्ट्राला का मिळू शकला नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “मुख्यमंत्रीपदी येताच वेदांताचे मालक अनिल अग्रवाल, फॉक्सकॉन आणि केपीएमजी यांच्यासोबत एक बैठक घेण्यात आली होती. बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा उपस्थित होते. यावेळी सरकारकडून ज्या काही सवलती देणे शक्य आहे, त्या सर्व दिल्या जातील,” असे यांना सांगण्यात आले होते.

शिवाय तळेगावजवळील १ हजार १०० एकर जमीनही देण्यात आली होती. ३० ते ३५ हजार कोटींची सवलतीसह सब्सिडी, अन्य बाबी सरकारच्यावतीने देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. तसेच या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो पाठींबा मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, अशी शक्यता एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मात्र, नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातल्या या पक्षांवर निवडणूक आयोगाची कारवाई

अयोध्येतील राम मंदिरावर १८०० कोटी खर्च होणार

इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटला लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री शिंदेंकडून ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ जाहीर

दरम्यान, रेल्वेमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली असून राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण क्षमता आहे आणि सरकारकडून त्याला पूर्ण सहकार्य असेल असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत सरकार नक्कीच प्रयत्न करेल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version