शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि खरी शिवसेना कोणाची याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून असले तरी दसरा अयोध्य आठवड्यावर आल्याने शिंदे गटाने दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेच्या आधीच दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रसिद्ध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. या पोस्टरवर धनुष्यबाण चिन्ह आणि वाघ ठळकपणे दिसत असल्याने चर्चा रंगली आहे. यातूनही शिंदे यांनी ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दसरा ५ ऑक्टोबरला होणार आहे. राज्यातील सत्तांतरानंतर होत असलेला हा पहिलाच मेळावा असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गट या दोघांनाही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. परंतु शिंदे गटाला बीकेसी मैदानावर मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टरवर बीकेसी ठिकाणाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. दसरा मेळाव्याला तीन लाख लोक येण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे . त्यामुळे या मेळाव्याची आता भव्य तयारी सुरु झाली असल्याचं बघायला मिता आहे
हे ही वाचा:
आणखी एका डिलिव्हरी बॉयने तरुणीची छेड काढली
सावित्रीबाई फुले देवी सरस्वतीला आवाहन करत असत…
हिजाब विरोधामुळे आता इराकही लक्ष्य
बेकायदेशीर अंमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उध्वस्त करणारे ‘ऑपरेशन गरुड’
असे आहे पोस्टर
शिंदे गटाने प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसत आहे. शेजारी भगव्य झेंड्यावर ‘आम्ही विचारांचे वारसदार’, ‘हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार’ असा मजकूर आहे .या पोस्टरवर छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे . मुंबई शहरात लावलेल्या काही पोस्टरवर ‘काळ कसोटीचा आहे, पण काळाला सांगा हा वारसा संघर्षाचा आहे’ असं लिहिलेलं बघायला मिळत आहे