पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे गौरोद्गार

पंतप्रधान मोदी बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम करतायत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगळवार, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले की, टिळक पुरस्कार नरेंद्र मोदींना मिळाल्याने त्यांना लोकमान्यांचे आशीर्वाद आणि बळ मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, हा पुरस्कार यापूर्वी अनेकांना दिला गेला आहे. ज्यांनी समाजामध्ये चांगलं काम केलं त्यांना आजपर्यंत देण्यात आला आहे. शरद पवारांना देखील हा पुरस्कार देण्यात आला आहे. जगात प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जगभरातले लोक महत्वाचा नेता म्हणून पाहतात ही अभिमानाची गोष्ट आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नरेंद्र मोदींनी देशाचं सूत्र हाती घेऊन ‘सबका साथ आणि सबका विकास’चा नारा दिला आहे. हा पुरस्कार त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. कोणी सही घेतात, फोटो काढतात आणि जेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना ग्लोबली पॉवरफुल्ल म्हणतात. तेव्हा अभिमानाने छाती फुलते, असेही गौरोद्गार नरेंद्र मोदींबद्दल एकनाथ शिंदे यांनी काढले.

नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठे नेते ठरलेले आहेत. लोकमान्यही जागतिक कीर्तिचे महापुरुष होते. त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिली. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करण्यासाठीही त्यांनी मोठं योगदान दिलं. फ्रान्स देशानेही मोदींचा सर्वोच्च सन्मान केला आहे. कुणी बॉस म्हणतंय तर कुणी पाय धरतंय, असा पंतप्रधान देशाने कधीही पाहिला नाही. त्यांच्यामुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; विरोधकांना धडकी

काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती

जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती

एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात सत्तास्थापन झाल्यानंतर अनेक जटील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडवलेले आहेत. ते बुलंद भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणत आहेत. या पुरस्काराने त्यांना लोकमान्यांचं बळ, ताकद आणि आशीर्वाद मिळणार आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version