26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणगणपती बाप्पा मोरया! यंदा निर्बंधमुक्त उत्सव

गणपती बाप्पा मोरया! यंदा निर्बंधमुक्त उत्सव

Google News Follow

Related

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण साजरे करण्यावर निर्बंध होते. पण यंदा सर्व मंडळांची, भाविकांची इच्छा लक्षात घेऊन दहीहंडी, गणेशोत्सव, मोहरम उत्सव राज्यात निर्बंधमुक्त साजरे होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. कायदा-सुव्यवस्था राखून हे उत्सव साजरे झाले पाहिजेत अशा सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

गणेशोत्सव आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. यावर्षी राज्यात निर्बंधमुक्त सण साजरे होणार आहेत. तसेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करण्याचे आदेशसुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

शिंदे फडणवीस सरकारने केलेल्या घोषणा पुढीलप्रमाणे

  • मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. यासाठी एकखिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या देण्यात येणार आहेत.
  • मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. मंडपाचे चार्जेस यातून सवलत दिली आहे.
  • पूर्वी मंडळांकडून हमीपत्र घेण्यात येत होते. ते घेण्यास आता मनाई केली आहे. वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमीपत्र घेऊ नका.
  • गणेश मूर्तींच्या ऊंचीवरील मर्यादा काढून टाकली आहे.

हे ही वाचा:

आरे व्वा! शिंदे-फडणवीस सरकारने कारशेडवरील बंदी उठविली

व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा

लोकसभेच्या गटनेतेपदावरून विनायक राऊतांची न्यायालयात धाव

भारताच्या दाेन महिला धावपटू उत्तेजक चाचणीत आढळल्या दाेषी; राष्ट्रकुल स्पर्धेला मुकणार

कोकणात जाण्यासाठी एसटीच्या जादा बसेस सोडणार आहेत. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. तसेच पुढील वर्षी पीओपीच्या मूर्तींसाठी ठोस निर्णय घेऊ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा