निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार चिन्ह बहाल केले आहे. काल निवडणूक आयोगाने बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे. आज, ११ ऑक्टोबर रोजी सात ते आठ तासांच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.
शिंदे गटाने काल चिन्हांचे दिलेले पर्याय निवडणूक आयोगाने नाकारले होते. त्यामुळे पुन्हा चिन्हांचे पर्याय देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले होते. आयोगाच्या सूचनेनंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने आज तीन पर्याय पाठवले होते. त्यानुसार निवडणूक आयोगाने ढाल तलवार चिन्ह त्यांना दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूर्य चिन्ह मागितलं होते. मात्र, ते झोराम राष्ट्रीय पक्ष आणि द्रमुकशी संबंधित असल्याने ते चिन्ह त्यांना नाकारण्यात आले. तसेच ढाल तलवार हे चिन्ह पीपल्स डेमोक्रॅटिक मूव्हमेंटकडे होते. पण २००४ साली या यादीतून वगळण्यात आल्याने बाळासाहेबांची शिवसेनेला दोन तलवार आणि एक ढाल हे चिन्ह मिळाले आहे.
आमदार भरत गोगावले यांनी हे चिन्ह त्यांच्या पक्षासाठी अचूक असल्याचे सांगितलं आहे. ढालीने जनतेचं रक्षण करायचं आणि दुश्मन अंगावर आलं तर तलवार उगारायची, असे भरत गोगावले म्हणाले आहेत. तसेच आम्हाला आग लावणारं चिन्ह नको होतं, असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाला टोला लगावला आहे.
हे ही वाचा:
पालघर साधू हत्याकांड प्रकरण सीबीआयकडे
भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?
डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात
गुगलने कान्होजी आंग्रे यांच्याबाबतीतली ‘ती’ चूक सुधारली
ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे. तर निवडणुकीसाठी मशाल चिन्ह देण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे.