‘बोम्मईंच्या खात्यावरून ट्विट कोणी केलं लवकरचं कळेल’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अधिवेशनात खुलासा

‘बोम्मईंच्या खात्यावरून ट्विट कोणी केलं लवकरचं कळेल’

नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनाचा पहिलाचं दिवस वादळी ठरताना दिसतं आहे. या अधिवेशनात सीमावादाचा मुख्य प्रश्न असल्याचे दिसून येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर भाष्य केलं आहे. याचे उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा खुलासा केला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटच्या मागे कोण आहे, हे लवकरच कळेल, असा खुलासा त्यांनी केला आहे.

अधिवेशनामध्ये एकनाथ शिंदे म्हणाले, सीमावाद निवारणासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. सीमेवर राहणाऱ्या लोकांसाठी सुरू असणाऱ्या काही योजना आधीच्या सरकारने बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरू केल्या. त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमावादामध्ये हस्तक्षेप केला आहे. या सीमावादावर राजकारण करू नये, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी दिले आहे. आपण सर्वानी मिळून सीमेवरील लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे. राजकारण करायला खूप विषय आहेत. बाकी विषयावर राजकारण करा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले, सीमावाद प्रश्नावर जेव्हा ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटले तेव्हा त्यांना सांगितलं की, तुम्ही जे ट्विट करत आहात ते चुकीच आहे. त्यावर त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ते ट्विट आमचं नाही. ते ट्विट ज्यांनी केलं आहे. त्याची माहितीही कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना मिळाली आहे. याची माहिती या सभागृहात मिळेल. या ट्विटच्या मागे कोणते पक्ष आहेत याची माहिती लवकरच मिळेल, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. यावेळी मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये आक्रमक झाल्याचे दिसून आले.

हे ही वाचा:

आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मविआचे आंदोलन

‘मोदी यांच्या भूमिकेमुळे जागतिक संकट टळले’

चुकीच्या विधानामुळे किरण रिजिजूनी राहुल गांधींना फटकारले

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अधिवेशनात गडचिरोलीच्या नक्षलवाद्यांचा मुद्दा मांडला आहे. नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगढ आणि ओडिसामधून तरुण आणले जात आहेत. नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोलीचा एकही तरुण नाही. गडचिरोलीमध्ये सहा हजार लोकांना रोजगार मिळाला असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Exit mobile version