जुना फोटो टाकून बनावट बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून अशा प्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शरद पवार यांची रात्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याची बातमी लोकसत्ता डॉट कॉमवर प्रसिद्ध झाली होती. पण त्यातील भेटीचा फोटो हा जुना असल्याचे स्पष्ट होत होते. यासंदर्भात स्वतः एकनाथ शिंदे यांनीच ट्विट करत सत्य काय ते समोर आणले आहे.
एकनाथ शिंदे यांनी हा फोटो कधीचा आहे, त्यासंदर्भातही ट्विट करून वास्तव स्पष्ट केले. ११ नोव्हेंबर २०२१ला एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचा तो फोटो असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर तो फोटो तेव्हा शेअर करण्यात आला होता. पण तोच फोटो आता वापरून एकनाथ शिंदे यांनी रात्री सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
भारत ताजिकिस्तान दोस्तीचं हॉस्पिटल!
ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली, महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके काय होणार वगैरे चर्चा सुरू झाल्या. पण आता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पडदा टाकला आहे. मात्र या प्रकारची खोटी बातमी देणाऱ्या माध्यमांवर मात्र सोशल मीडियावर चांगलीच झोड उठली.