रावण राज्य गेलं आणि रामावर भक्ती असणाऱ्यांचं सरकार आलं आहे!

आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार हल्ला

रावण राज्य गेलं आणि रामावर भक्ती असणाऱ्यांचं सरकार आलं आहे!

रावण राज्य गेलं आणि रामावर भक्ती असणाऱ्यांचं सरकार आलं आहे, असे जोरदार टीकास्त्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत पोहोचताच विरोधकांवर सोडले आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सकाळी अयोध्येमध्ये हेलिकॉप्टरने आगमन झाले त्यावेळी जोरदार स्वागत करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाण्याच्या आधी विरोधकांनी टीका केली होती. हे कलयुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण, नक्कीच महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य आणू.अशी टीका केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील दुष्काळावर लक्ष ठेवून आहे. पंचनामे सुरू आहेत. विरोधकांचं कामच टीका करण्याचं आहे, असं फडणवीस म्हणाले. तर आदित्य ठाकरे यांना खूप शिकायचं आहे. रिएक्ट करण्याएवढे ते मोठे झालं नाहीत. ते तेवढे प्रगल्भ बोलत नाहीत, असा टोलाही लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला असताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर गेले अशी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, टीका करणं हे विरोधकांच काम असल्याचे म्हटलं आहे. तर त्यांची आस्था नसेल पण प्रभू श्रीराम ही आमची आस्था आहे. आणि प्रभू श्रीराम हे एख अस व्यक्तिमत्व आहे की, ज्यांनी राज्यकारभार कसा करावा हे आपल्याला सांगितलं. गांधीजींची संकल्पनाही रामराज्याचीच होती. मग जर रामराज्याची संकल्पना राबवायची असेल तर रामाचं दर्शन तर घेतलंच पाहिजे असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदें आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसेना-भाजपच्या आमदारांसह सकाळी लखनऊ येथून अयोध्येमध्ये आगमन झाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि रामभक्तानी मोठी गर्दी केली होती. विमानतळावर येताच भाजप नेते व कार्यकर्त्यांकडून त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले सारा परिसर भगवामय झाला होता. जय श्रीरामाच्या घोषणांचा गजर सर्वत्र सुरु होता. अशा रामभक्तीच्या वातावरणातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी श्रीरामच्या दर्शनाच्या दिशेने महारॅलीच्या माध्यमातून श्रीराम मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरु केली. महारॅलीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राम मंदिरात रामलल्लाची महाआरती करण्यात आली. महाआरतीवेळी शिवसेनेचे सर्व खासदार, आमदार आणि मंत्री हजर होते.

आरतीच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीराम मंदिराला लहानशा डबीतून आकर्षक २ तोळ्याचा सोन्याचा बाण भेट दिला. आरती झाल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीराम मंदिर परिसरातील बांधकामाची पाहणी केली. यावेळी सर्व आमदारही सोबत होते. यानंतर शिंदे व फडणवीस यांनी हनुमान गढीवर जात हनुमानाचे दर्शन घेतले. खासदार ब्रिजभूषण सिंह यांनीही एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची हनुमान गढी येथे भेट घेतली. त्यानंतर जैन मंदिराला भेट दिल्यानंतरअयोध्येतल्या लक्ष्मण किल्ला येथे संत महंतांची भेट घेऊन संवाद साधला. संध्याकाळी शरयू नदीवर महाआरती करण्यात आली.

हे ही वाचा:

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

मोदींनी आमचं स्वप्न पूर्ण केले

लोकांमध्ये अपार उत्साह आहे. आनंद आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. लखनऊपासून अयोध्येपर्यंत स्वागत केलं जातंय. संपूर्ण अयोध्या भगवी झाली आहे. राममय झालं आहे. आम्ही आभार मानतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तर, हा आत्मिक आनंद असतो तो घेण्यासाठी आलो. आमच्या दौऱ्याला प्रतिसाद मोठा आहे. हिंदुत्ववादी सरकार आल्याचा आनंद आहे. आमचा तो संघर्षाचा काळ होता. मोदींनी आमचं स्वप्न पूर्ण केलं अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अयोध्येत येण्याची एकनाथ शिंदे यांची हि पहिलीच वेळ आहे.

Exit mobile version