जे विचारतात, महाराष्ट्रासाठी काय दिलं? तर त्यांनी बहुतेक देशाचा अर्थसंकल्प वाचला नाही. रेल्वे मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार महाराष्ट्रासाठी आतापर्यंत रेल्वेसाठी १३ हजार ५०० कोटी कधीच मिळाले नव्हते. ही पहिली वेळ आहे ज्यात महाराष्ट्रासाठी १३ हजार ५०० कोटींचं बजेट मिळालं. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री स्वतःसाठी दिल्लीला जातात, गुवाहाटी आणि सुरतला जातात. पण दिल्लीला जाऊन महाराष्ट्र राज्यासाठी काय मागितलं? अशी टीका केली होती त्याला मुख्यमंत्र्यांनी वंदे भारत एक्सप्रेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जोरदार उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर या दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या दोन्ही एक्सप्रेस आजपासून नियमित धावण्यास सुरुवात झाली आहे.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला केला. नुकत्याच झालेल्या ग्लोबल सर्व्हे मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देशातील पहिल्या क्रमांकात झळकल्याबद्दल अभिनंदनही केलं.
आपल्या देशासाठी मोठ्या अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगून मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की , महाराष्ट्रासाठी आतापर्यंत रेल्वेसाठी १३ हजार ५०० कोटी कधीच मिळाले नव्हते. ही पहिली वेळ आहे ज्यात महाराष्ट्रासाठी १३ हजार ५०० कोटींचं बजेट मिळालं. आमचे युती सरकार सात महिन्यांपूर्वी सत्तेवर आले असून, केंद्र सरकारचा संपूर्ण पाठिंबा आम्हाला मिळत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला १३ हजार ५०० कोटी रुपये असा आजवर कधीही नव्हता इतका भरीव निधी मिळाला आहे, त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प गतीने पूर्ण होतील आणि लाखों प्रवाशांना फायदा मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा
करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…
आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?
इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले
मुख्यमंत्री भाषणात पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले होते, त्यानंतर मुंबईत मेट्रोची त्यांनी सुरुवात केली आणि आता वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होत आहे. अशाच रीतीने एमटीएचएल, मेट्रोचे इतर मार्ग, मुंबई ते पुणे मिसिंग लिंक असे प्रकल्पही लवकरच सुरू होतील आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रित केले जाईल असे सांगून आगामी भेटीचे आमंत्रणही दिले.