उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीमुळे दाऊद इब्राहिम, मुंबई दंगल आणि इतर विषयांवर निर्णय घेण्यात आले नाहीत,अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जेव्हा जेव्हा सरकारसमोर हिंदुत्वाचे मुद्दे येत होते, तेव्हा सरकार निर्णय घेऊ शकत नव्हते असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
शिवसेना आणि भाजपाने २०१९ च्या विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या. मात्र महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केले. त्यामुळे जेव्हा-जेव्हा हिंदुत्वाचे मुद्दे समोर आले, तेव्हा अनेक प्रकरणे समोर आली, मुंबई बॉम्बस्फोट, दाऊदचा मुद्दा पुढे आला, दाऊदचा मुद्दा आला आणि असे इतर मुद्दे आले, तेव्हा आम्ही निर्णय घेऊ शकलो नाही. १९९३ च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी गँगस्टर दाऊद इब्राहिमशी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कथित संबंध असल्याचे समोर आले. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक
ब्रिटनच्या आरोग्य सचिव, अर्थमंत्र्यांनी दिला राजीनामा
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला…
उद्धवजी, मुर्मूना पाठिंबा द्या! खासदार राहुल शेवाळे यांचा लेटरबॉम्ब
पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे आमदार त्यांच्या मतदारसंघात काम करू शकले नाहीत. त्या मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत झालेल्यांना एकत्र करत होते. निवडणूक जिंकल्यावर मतदारांना पाणी, रस्ते आणि इतर मूलभूत कामांसह विकासकामांची अपेक्षा असते.आमच्या आमदारांना निधीची कमतरता आणि इतर समस्यांमुळे हे करता आले नाही. या समस्या सोडवाव्यात, यासाठी आम्ही वरिष्ठांशी अनेकदा बोललो. पण दुर्दैवाने त्यात आपण यशस्वी होऊ शकलो नाही. त्यामुळेच आमच्या अनेक आमदारांनी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.