ठाकरे गटाकडून मिंधे सरकार मिंधे सरकार असा वारंवार आरोप केला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमध्ये झालेल्या जाहीर सभेतून उद्धव ठाकरे यांचा जोरदार समाचार घेतला आहे. एकनाथ शिंदे वफादार आहे. हा गद्दार नाही, खुद्दार आहे. माझ्या रक्तात बेईमानी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर दत्ताजी शिंदे, महादजी शिंदेंनी बलिदान दिलं. मागे नाही हटले. हा मावळा तुमच्यासारखा सत्तेसाठी कधी मिंधा झाला नाही, होणार नाही , अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे याना जोरदार टोला लगावला आहे. मिंधे सरकारवरून अनेकदा झालेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच उत्तर दिले आहे. गेल्या ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानात जाहीर सभा घेतली होती. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिपणी केली होती. त्याच गोळीबार मैदानावर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेत काय बोलणार याकडे सेक्सला महाराष्ट्राचे लक्ष्य लागून राहिलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या खोक्यांच्या आरोपवरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला. हे सांगतायत ५० लोकांनी खोके घेतले. रामदास कदमांनी आख्खं आयुष्य संघटनेसाठी दिलं. जीवाची बाजी लावली. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. शेकडो केसेस अंगावर घेतल्या. तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय? तुम्हाला बोलताना काहीतरी वाटलं पाहिजे. तुमच्यावर किती केसेस आहेत? या एकनाथ शिंदेवर १०९ केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे? असा जोरदार सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
हे ही वाचा: ‘
ठाण्याची एकमेव धावपटू निधीसिंगला चेन्नईमध्ये यश तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा
बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार?
तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.
सहन करण्याचीही एक मर्यादा असते
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करता असतात. पण त्याला कधीही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. पण या सभेतून मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला . मुख्यमंत्री म्हणाले म्हणाले , माझ्याकडे खूप काही आहे. पण मी बोलत नाही याचा अर्थ मला काही माहिती नाही असा कुणी घेऊ नये. सहन करण्याचीही एक मर्यादा असते. त्यापलीकडे माणूस गेल्यानंतर सगळे बांध तुटून जातात. ती वेळ आमच्यावर आणू नका एवढंच सांगतो अशा शब्दात मुख्यमंत्री यांनी खडेबोल सुनावले.