पाचोऱ्यामध्ये रविवारी झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या य वक्तव्याची भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी कडक शब्दात निंदा केली आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्याचा निषेध करावा, तेवढा थोडा आहे. उद्धव ठाकरे हे वैयक्तिक द्वेषातून पछाडलेले आहेत. यातूनच मोदींविषयी त्यांचे हे वक्तव्य आले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ही उद्धव ठाकरेंची पोटदुखी आहे. या पोटदुखीतूनच ते असे वक्तव्य करण्याचे पाप करत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची ही संस्कृती नाही. उद्धव ठाकरेंनी आधीच सत्तेसाठी, मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचार पायदळी तुडवले आहेत. आज त्यांनी त्यांची संस्कृतीही पायदळी तुडवली आहे हे कालच्या त्यांच्या वक्तव्याने हे सिद्ध झाले. उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सध्या सरकलेली दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधान पदी असलेल्या व्यक्तीबद्दल कधीही असे भाष्य केल्याचे आठवत नाही. असल्याचा जोरदार घणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देशात नव्हे तर जगभरात सिद्ध केलंय. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याची व्यवस्था केली आहे. जी २० चं यजमानपद मिळवलं. प्रत्येक देशवासियांना अभिमान वाटावा, असं त्यांचं काम आहे. संपूर्ण देशातील दीडशे कोटी जनता त्यांचा परिवार आहे. जनतेला ते आपलं मानतात. त्यामुळे मोदींचा एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा, निषेध करणं तेवढा थोडा आहे असा जोरदार प्रहार शिंदे यांनी केला.
मोदींच्या वादळात ठाकरे उडून जातील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करतांना म्हणाले, १५० हून अधिक देशांनी ७८टक्के पसंती ज्या नेतृत्त्वाला दिली, असे मोदी आणि त्यांचा हे एकेरी उल्लेख करतात. मोदीचं वादळ महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे उडून जातील. इतकं मोठं वादळ महाराष्ट्रात येणार आहे. ठाकरे हे मोदींच्या वादळाला घाबरतात म्हणून ते मोदी मोदी करतात अशा शब्दात बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले.
हे ही वाचा:
यात्रा कर घेऊनही गणपतीपुळ्यात पर्यटकांना सुविधांच्या नावाने बोंबच .. !
अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने
देशात विणल्या गेले तब्बल ५० हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांचे जाळे
साशानंतर आता उदय चित्त्याने घेतला जगाचा निरोप
मोदींची उंची काय, तुमची उंची काय ?
मोदींची उंची काय, तुमची उंची काय. कधी विचार केला का? तुमच्याकडे दोन लोक राहायला तयार नाहीत. मोदींची जागा सर्व जगाने मंजूर केली आहे. भारताला सर्वोत्तम देश बनवण्याचा निर्णय, संकल्प मोदी करतात आणि तुम्ही इथे त्यांची खिल्ली उडवता. ज्यांच्या विश्वासावर तुम्ही २०१४ मध्ये तुमचे खासदार, आमदार निवडून आणले. तुमच्या बाजूला जे आता कोणी उरलेत तेसुद्धा मोदींच्या कृपेनं आलं आहे. त्यामुळे मोदींचा एकेरी उल्लेख करणे हा बेईमानपणा आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.