संजय राऊत यांच्या सुपारी आरोपाची गंभीर दखल, मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

संजय राऊत यांच्या सुपारी आरोपाची गंभीर दखल, मुख्यमंत्र्यांनी दिले हे आदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सांगितले की,  खासदार  संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्याची पोलीस चौकशी करतील. मुख्यमंत्र्यांच्या मुलाकडून ‘आपल्या जीवाला धोका’ असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी राऊत यांनी मंगळवारी पोलिसांना पत्र लिहिले होते. मला मारण्यासाठी सुपारी देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केला होता. या पत्राची प्रत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर खळबळ माजली होती. संजय राऊत यांच्या जीवाला धोका असल्याच्या दाव्याची आणि कथित सुपारी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे यांनी मला ठार मारण्यासाठी ठाण्यातील राजा ठाकूर या गुन्हेगाराला सुपारी दिली आहे. मला याबाबत ठोस माहिती मिळाली आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी तुम्हाला माहिती देत ​​आहे. असल्याचे म्हटले आहे. संजय राऊत यांचा हा आरोप खुद्द राजा ठाकूर यांनी फेटाळला आहे. संजय राऊत यांच्यावर मानहानीचा दावा दाखलकरण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. . राजा ठाकूर यांच्या पत्नी पूजा ठाकूर यांनी बुधवार, २२ फेब्रुवारी रोजी संजय राऊत यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला . त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल. हा दावा वस्तुस्थितीवर आधारित आहे की केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे हे देखील आम्ही शोधून काढू. राज्यात सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आमचे काम आहे असेही मुखमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

सुरक्षा काढण्यामागे राजकीय हेतू नाही

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की , आवश्यकतेनुसार सुरक्षा पुरवण्यासाठी एक समिती यापूर्वीच स्थापन केली आहे. राजकीय कारणांमुळे सुरक्षा काढून घेण्यात आलेली नाही. ही समिती धोक्याचा आढावा घेऊन सत्ताधारी पक्षातील किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही व्यक्तीला सुरक्षा पुरवेल राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या पत्राबाबत फडणवीस म्हणाले होते की, राज्यसभेच्या खासदाराला विचार न करता आरोप करण्याची सवय आहे, तरीही त्यांचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे पुनरावलोकनासाठी पाठवले जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. .

Exit mobile version