गुरव समाजासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. गुरव समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संत काशीबा यांच्या नावाने युवा आर्थिक महामंडळ स्थापन केले आहे. त्यासाठी सुरूवातीला ५० कोटींची तरतूद करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सोलापुरात रविवारी गुरव समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संत काशीबा युवा विकास महामंडळाची घोषणा केली.
देव, देश, धर्माचे रक्षण करून संस्कृती आणि परंपरा जोपासणाऱ्या गुरव समाजाच्या सर्वांगीण आर्थिक विकासासाठी हे महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. योजनेचा भविष्यात विस्तार करण्याची ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हे सरकार संपूर्णपणे सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी, दीनदुबळ्यांचे आहे. गेल्या पाच महिन्यांत त्याची प्रचिती सर्वांना आली आहे. लोकांच्या मनातल्या या सरकारला गुरव समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. म्हणूनच या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने पाऊल टाकले आहे.
लोकहितासाठी आपले सरकार अहोरात्र काम करीत आहे. कामांच्या वाढत्या व्यापामुळे थोडीशीचा झोप घ्यावी लागते. एरव्ही सदैव जागे राहावे लागते. कारण सरकारच्या अनेक चांगल्या कामांवरही टीका करण्याची विरोधकांमध्ये स्पर्धा लागली आहे. परंतु जेवढे आरोप होतील, त्याच्या दुप्पट कामे करू. शेवटी आम्ही देणारे आहोत,घेणारे नाहीत, अशा शब्दात विरोधकांना टोला मारण्याची संधी मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.
हे ही वाचा :
गोव्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘या’ नेत्याचं नाव
गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
गुरव समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका दिवसात ठरले ‘लोकप्रिय’
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील विजापूर रस्त्यावर नेहरू नगरच्या शासकीय मैदानावर या अधिवेशनाचे आयोजन राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने केले होते.