पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये युद्ध सुरूच आहे. ही राजकीय लढाई आता ‘आकाशाला’ भिडताना दिसत आहे. प्रत्यक्षात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला नो फ्लाय झोन मुळे परवानगी देण्यात आलेली नाही. याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा आहे.
पंजाब विधानसभा निवडणुकीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय पक्षांमधील युद्धही तीव्र होत आहे. आता ही लढाई जमिनीवर तसेच आकाशातही दिसत आहे. प्रत्यक्षात सोमवारी मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करू दिले नाही. सीएम चन्नी यांना चंदीगडमधील राजेंद्र पार्कपासून होशियारपूरला जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे चन्नी राहुल गांधींच्या होशियारपूरच्या सभेला पोहोचू शकले नाहीत. चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला परवानगी न देण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंजाब दौरा असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
भारताने घातली आणखी ५४ चिनी ऍप्सवर बंदी
मुलाच्या हव्यासापोटी गरोदर बायकोला केली मारहाण; नंतर दिला तलाक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीआयपी दौऱ्यामुळे चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला थांबण्यास सांगण्यात आले होते. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे होशियारपूरमध्ये राहुल गांधींसोबत निवडणूक कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे ‘नो फ्लाय झोन’ लागू करण्यात आला आहे, त्यामुळे सीएम चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला टेक ऑफ करण्यापासून रोखण्यात आले आहे.
पीएम मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा आहे. सीएम चन्नी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याबद्दल भाजपने त्यांच्यावर आरोप केले होते. तेव्हापासून या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी तीन सदस्यीय तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते.