मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही

“हे केवळ पक्षप्रमुख होऊ शकतात, मुख्यमंत्री इतक्या कोत्या मनाचा, सूडबुद्धी असू शकत नाही.” असा हल्लाबोल भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत चांगलाच राडा घातला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात युवासैनिकांनी थेट नारायण राणे यांच्या घराबाहेर जाऊन आंदोलन केलं. युवासैनिकांनी राडा घातल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी वरुण सरदेसाईंना आणि सोबतच्या युवासैनिकांना पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या या कृत्यानंतर भाजपाकडून उद्धव ठाकरेंवर कडाडून टिका केली जात आहे.

मुंबईत विविध ठिकाणी राणा आणि दगडफेकप्रकरणी काल तीन गुन्हे दाखल झाले आहेत. सांताक्रुज पोलिस ठाण्यात २ तर कस्तूरबा मार्ग पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा असे एकूण ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात दौरा सुरू केल्यानंतर शिवसेना बिथरल्याचे चित्र दिसते आहे. ही जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यावर कोरोनाचे निर्बंध पाळले जात नसल्याची टीका शिवसेनेकडून केली जाऊ लागली. नियम पाळा नाहीतर जनआशीर्वाद यात्रेवर बंदी घालावी लागेल, असा इशाराही देण्यात येऊ लागला. त्यासंदर्भात नारायण राणे यांच्यावर विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचे थोबाड फुटले…नारायण राणेंना जामीन मंजूर

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

अंजू बॉबी जॉर्जची ‘शैली’ गाजणार!

शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर का गुन्हे दाखल केले नाहीत?

मुंबईत याच जनआशीर्वाद यात्रेसाठी आलेले नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले तेव्हाही या स्मृतिस्थळाला भेट घेऊ दिली जाणार नाही, असा इशारा शिवसेनेकडून दिला गेला होता. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. मात्र त्यांनी दर्शन घेतल्यावर या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले.

Exit mobile version