लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

लॉकडाऊन संदर्भात सर्वपक्षीय बैठक, लवकरच लॉकडाउनचा निर्णय?

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित  राहणार आहेत.

या बैठकीत राज्यात तीन आठवड्याच्या लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच जर हा लॉकडाऊन लावण्यात आला तर मग नियमावली गाईडलाईन्स कशा प्रकारे करायच्या, याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते.

हे ही वाचा:

नागपूरमधील कोरोना प्रसाराचे कारण उघड

पश्चिम बंगालमध्ये आज चौथ्या टप्प्याचे मतदान

पश्चिम बंगालमध्ये पराभव अटळ, तृणमूलच्या ‘या’ नेत्याची कबुली

नागपूरमध्ये कोरोना रुग्ण असलेल्या हॉस्पिटलला आग

राज्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यानुसार शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. वीकेंड लॉकडाऊनमुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अनेक शहरात, जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात कडकडीत लॉकडाऊन पाळला जात आहे.

Exit mobile version