मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काँग्रेसवर पाळत ठेवतात?

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काँग्रेसवर पाळत ठेवतात?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण स्वबळाची भाषा केल्यानं त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेत अधिकच प्रकर्षाने समोर येत आहेत.

“त्यांच्याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्रिपद आहे. त्यामुळे यंत्रणांना सर्व रिपोर्ट त्यांना द्यावे लागतात. कुठे कुठे काय चालू आहे, आंदोलन कुठे काय चालू आहे, हे सगळं त्यांना अपडेट द्यावे लागतात. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आहे. महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. हे त्यांना माहीत नाही का? ते कुठे ना कुठे आपल्याला पिंजऱ्यात आणायचा प्रयत्न करणार” असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आगामी निवडणुका महाविकास आघाडीत न लढता काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढेल असं नाना पटोले यांनी अनेक वेळा सांगितलं आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी पाळत ठेवत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केल्याने, महाविकास आघाडीतील वाद हळूहळू समोर येत आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

‘या’ नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

लोणावळ्यातील एका मेळाव्यात नाना पटोलेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिलेला चालतो. मी बोलल्यावर खुपतं, असं सांगतानाच, आपण काहीच बोलायचं नाही, आपल्याला होत असलेला त्रास आपली ताकद बनवा. मी स्वबळावर लढायचं म्हणालो होतो, त्यावर मी माघार घेणार नाही. असं पटोले म्हणाले होते.

Exit mobile version