आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात ४७ जागांसाठी २७ मार्च रोजी, दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी, तर तिसऱ्या टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. या मतदानातून राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी सीएएच्या मुद्द्याचा राज्यातील मतदानावर किती परिणाम झाला हेदेखील स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, टीव्ही ९ – पोलस्ट्राटने या मतदानानंतरचा एक्झिट पोल सादर केला आहे. त्यानुसार आसामध्ये एनडीए आणि युपीएमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एग्झिट पोलमधील आकड्यांनुसार राज्यात एनडीएचं पारडं थोडं जड आहे. परंतु एनडीएला मोठ्या फरकाने बहुमत मिळणार नाही.
हे ही वाचा:
बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक
मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’
माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन
कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
२०१६ मध्ये क्लीन स्वीप करत पहिल्यांदाच भाजपाने आसाममध्ये स्वतःचा मुख्यमंत्री बसवला होता. त्यामुळे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने यावेळी जोरदार प्रयत्न केले. त्यामुळे येथील मतदार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. इंडिया टुडे – ऍक्सिस माय इंडियाच्या एक्सिट पोल नुसार, एनडीए ७५-८५, युपीए ४०-५० तर इतर १-४ जागा मिळवतील. जण की बातच्या एक्सिट पोल नुसार एनडीए ७०-८१, युपीए ४५-५५, इतर ०-१ अशी स्थिती राहणार आहे.