25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणतामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्पष्ट चित्र

तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये सर्वात स्पष्ट चित्र

Google News Follow

Related

पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम या राज्यांतील महासंग्रामाकडे अवघ्या देशाचे जेवढे लक्ष लागले आहे, तितकेच महत्व पुद्दुचेरी सारख्या केंद्रशासित प्रदेशालाही आले आहे. इथल्या महासंग्रामात नेमकं कोण बाजी मारणार याचीही उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुकला घवघवीत यश मिळणार असल्याचं जवळपास सर्वच एक्सिट पोल सांगत आहे. तर, मागील दोन टर्म केंद्रातील सत्ता अबाधित राखलेल्या एनडीएलाच पुद्दुचेरीच्या गडावर आपला झेंडा फडकावता येणार असल्याचा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

राष्ट्रपती राजवट असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात आणि तामिळनाडूमध्ये ६ एप्रिल २०२१ रोजी निवडणूक पार पडली. एकाच टप्प्यात संपूर्ण राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात मतदान पार पडले असून, २ मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या पुद्दुचेरीमध्ये भाजपाने स्थानिक पक्षांना बरोबर घेऊन काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. पुद्दुचेरीच्या विधानसभेवर उपराज्यपालांकडून तीन सदस्यांची शिफारस केली जाते, ते तीनही भाजपचेच आहेत.

२०१६ मध्ये तामिळनाडूत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला ११६ जागा तर डीएमकेला ८९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसने ९ जागा जिंकल्या होत्या. तर या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नव्हते. आता मात्र सर्वच एक्सिट पोलमध्ये डीएमके-काँग्रेस युतीला बहुमत मिळणार असल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा:

आसाममध्ये अटीतटीची लढाई

बंगालमध्ये ९६ जागा ठरणार निर्णायक

मुख्यमंत्र्यांचे आज पुन्हा ‘फेसबुक लाईव्ह’

माजी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांचे कोरोनामुळे निधन

२०१६ मध्ये पुद्दुचेरीत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १५ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला खातेही खोलता आले नव्हते. आता मात्र काँग्रेसचे ग्रह फिरले आहेत. सात आमदारांच्या राजीनाम्यामुळे गडगडलेले सरकार यावेळी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यात धूसर आहे. २०१६ मध्ये एआयएनआरसीला ८ जागा, एआयएडीएमकेला ४ जागा, तर डीएमकेला २ जागांवर विजय मिळाला होता. सर्वच एक्सिट पोलनुसार एनडीएचं सरकार हे पुद्दुचेरीत येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा