जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट

सर्व गुन्हे मागे घेण्यात आले

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना क्लीनचीट

शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना भूखंड घोटाळा प्रकरणातून क्लीनचीट मिळाली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे रविंद्र वायकरांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रविंद्र वायकरांना क्लीन चीट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी EOW कडून कोर्टात सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला. यानंतर आता मुंबई महापालिकेने गैरसमजातून हा गुन्हा दाखल केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …

जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच

हिंदुत्ववादी शिवानी राजा ब्रिटनच्या निवडणुकीत जिंकल्या!

तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!

मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत ५०० कोटींच्या घरात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Exit mobile version