आसाम पोटनिवडणुकीत भाजपा आणि त्यांचा मित्रपक्ष यूपीपीएलने पाचही जागा जिंकल्या आहेत. भाजपच्या सुशांत बोरगोहेन यांनी ३०,५६१ मतांच्या फरकाने थौरा विधानसभा जागा जिंकली. भाजपचे सहयोगी UPPL उमेदवार जिरॉन बासुमाटरी आणि जोलेन डेमरी यांनी गोसाईगाव आणि तामुलपूर जागा अनुक्रमे २८,२५२ आणि ५० हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने जिंकल्या. भबानीपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार फणीधर तालुकदार यांनी २५,६४१ मतांनी विजय मिळवला. भाजपच्या रुपज्योती कुर्मी यांनी मारियाणी जागेवर ४०,१०४ मतांनी विजय मिळवला.
आसाममधील गोसाईगाव, भबानीपूर, तामुलपूर, मारियानी आणि थौरा या पाच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली. सकाळी १० ते ११ पर्यंत सुरुवातीचा कल दिसून येईल.
पोटनिवडणुकीत एकूण ७४.०४ टक्के मतदान झाले, त्यापैकी सर्वाधिक ७८ टक्के मतदान भबानीपूर विधानसभा मतदारसंघात झाले. गोसाईगाव येथे ७७.३७ टक्के, तामुलपूर येथे ६७.८८ टक्के मतदान झाले. थोरा येथे ७७.५६ टक्के तर मारियानी येथे ७१.७० टक्के मतदान झाले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पाचपैकी तीन जागांवर आपले उमेदवार उभे केले, उर्वरित दोन युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) च्या उमेदवारांना सोडले. काँग्रेसने सर्व पाच जागांवर निवडणूक लढवली, तर त्यांचे माजी मित्र पक्ष ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट (BPF) यांनी अनुक्रमे दोन आणि एक जागा लढवली.
हे ही वाचा:
भारतीयांना इस्रायलची मैत्री बहुमूल्य
जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य
धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!
‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’
पाच जागांसाठी एकूण ३१ उमेदवार रिंगणात असून सुमारे ७.९६ लाख मतदार आहेत. कोविड-१९ नंतरच्या गुंतागुंतीमुळे आमदारांच्या मृत्यूनंतर गोसाईगाव आणि तामुलपूर येथे पोटनिवडणूक आवश्यक होती, तर थॉवरा, मारियानी आणि भबानीपूरच्या उर्वरित विधानसभा जागा त्यांच्या आमदारांनी सत्ताधारी पक्षात सामील झाल्यामुळे रिक्त झाल्या होत्या.