वक्फ कायद्यावरून जम्मू- काश्मीर विधानसभेत तिसऱ्या दिवशीही गदारोळ सुरूचं असून वक्फवर चर्चा व्हावी अशी मागणी करत नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांनी जोरदार निषेध केला. त्यानंतर काही आमदारांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती असून हे केवळ विधानसभेतच नाही तर बाहेर परिसरातही आमदारांमध्ये संघर्ष झाला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.
आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक यांनी हिंदूंबद्दल केलेल्या टिप्पणीनंतर जम्मू- काश्मीर विधानसभेत हाणामारी झाली. भाजपा आमदारांनी आमदार मेहराज मलिक यांनी केलेल्या टिप्पणीवर आक्षेप घेतला. मलिक यांनी हिंदूंचा अपमान केल्याचे भाजपा आमदारांनी म्हटले. मेहराज मलिक यांनी विधान केले होते की, हिंदू टिळक लावतात पण पाप करतात. या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे आमदार विक्रम रंधावा यांनी मलिक यांच्या टिप्पणीचा निषेध केला. विक्रम रंधावा म्हणाले की, त्यांनी हिंदूंना शिवीगाळ केली. आम्ही हे सहन करणार नाही. त्यांनी म्हटले आहे की, टिळक लावून हिंदू पाप करतो. लोकांकडून चोरी करतात, दारू पितात, आम्ही त्यांना हिंदू काय करतात ते सांगू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
पुढे आमदार विक्रम रंधावा म्हणाले की, “आमचे दुर्दैव आहे की आमच्याकडे आमदार म्हणून स्वस्त मानसिकतेचे लोक आहेत. जरी ते एका विशिष्ट समुदायाचे असले तरी, त्यांचा हल्ला नेहमीच भाजपा आणि हिंदू समुदायावर असतो. मेहराज मलिक यांच्याविरुद्ध खूप गुन्हे आहेत, त्यांची नार्को चाचणी करावी आणि त्यांना विधानसभेतून निलंबित करण्याची विनंती सभापतींना करू.”
हे ही वाचा..
मणिपूरमध्ये खंडणीच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांना अटक
बघा रोजगाराच्या संधी कशा निर्माण होणार
रेपो दरात २५ आधार अंकांची कपात
मालेगावच्या मशिदीत मुस्लिम मौलवींनी काय भूमिका मांडली?
राज्यातील बेरोजगारी आणि रोजंदारी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी या मागणीसाठी भाजपा आमदारांनी राज्य सरकारविरुद्ध विधानसभेबाहेर निदर्शने केली. विधानसभेच्या आवारात झालेल्या निषेधादरम्यानही दोन्ही बाजूंचे आमदार एकमेकांशी भिडले. विरोधी पक्षनेते सुनील शर्मा म्हणाले की, सरकार चर्चेपासून पळ काढत आहे. मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा व्हावी या मागणीसाठी एनसी, काँग्रेस आणि पीडीपीच्या सदस्यांनी गोंधळ घातला.