26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणकोविडच्या भीतीने राजा बसला घरी वरून सत्ताधारी-विरोधक भिडले

कोविडच्या भीतीने राजा बसला घरी वरून सत्ताधारी-विरोधक भिडले

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.

Google News Follow

Related

राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांकडून आंदोलन सुरू होते. यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला.

“कोविडच्या भितीने राजा बसला घरी, हवालदिल जनता फिरली दारोदारी, युवराजांच्या चेल्यांनी लुटली तिजोरी, भ्रष्टाचाराचे खोके पोहचले त्यांच्या घरोघरी” अशा ओळी असलेले फलक घेऊन सत्ताधारी घोषणाबाजी करत होते. यावेळी शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते.

“सचिन वाजेचे खोके मातोश्री ओके. लावासाचे खोके बारामती ओके. अनिल देशमुखचे खोके सिल्व्हर ओक ओके” अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यादरम्यान, अचानक विरोधक आमदारही पायऱ्यांजवळ पोहचले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पुढे शाब्दिक चकमक सुरू झाली आणि धक्काबुक्की देखील झाली. यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे घटनास्थळी आले आणि त्यांनी मध्यस्ती करत त्यांच्या आमदारांना आतमध्ये नेले.

हे ही वाचा:

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

दिल्ली, उत्तरप्रदेशात हल्ल्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्याच्या पुण्यातून आवळल्या मुसक्या

पाकिस्तानात ब्राह्मोस पडल्याप्रकरणी तीन अधिकारी बडतर्फ

यापूर्वी चार दिवस विरोधक पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. मात्र, आज चित्र पालटले होते आणि विरोधकांच्या जागी सत्ताधारी घोषणाबाजी करताना दिसत होते. विरोधक घोषणा करत असताना असे घडले नव्हते पण आता सत्ताधाऱ्यांनी केलेल्या घोषणा विरोधकांना झोबल्या असाव्यात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा