रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

रायगड एमआयडीसीत शिवसेना-राष्ट्रवादीत राडा

Photo credit Z24taas

रायगड विळेभागाड एमआयडीसीतील पॉस्को कंपनीच्या एका कामावरून शिवसेना- राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. याच कारणाने या भागात गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार घडले आहेत.

पॉस्‍को कंपनीतून माल वाहून नेणारे ट्रक विळे-कोलाड मार्गावर सुतारवाडी इथं राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी अडवून फोडले. याची माहिती मिळताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तेथे पोहोचले असता त्‍यांच्‍याही गाडया फोडण्‍यात आल्‍या. पॉस्‍को स्‍टील कंपनीच्‍या भंगारावरून शिवसेना-राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमध्‍ये हा राडा झाला. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात सर्वत्र हॉलमार्कची सुविधा द्या!

आयपीएलवरही आता कोरोनाचे संकट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

शिवसैनिक आणि राष्‍ट्रवादीच्‍या कार्यकर्त्‍यांनी एकमेकांच्‍या गाडया फोडून नुकसान केलं आहे. यात आमदार भरत गोगावले यांच्‍या गाडीचाही समावेश आहे. त्‍यावेळी या गाडीत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेनेचे युवा अधिकारी विकास गोगावले हे होते, अशी माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर परीसरात दंगल नियंत्रण पथक तैनात करण्‍यात आले आहे. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्‍यात परस्‍पर विरोधी गुन्‍हे दाखल करण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी दिली.
विळे भागाड एमआयडीसीत असलेल्‍या पॉस्‍को स्‍टील या विदेशी कंपनीचे भंगार उचलण्‍याचे कंत्राट कुणाला मिळणार यावरून शिवसेना आणि राष्‍ट्रवादीत नेहमीच संघर्ष होत असे.

कंपनीने या भंगारासाठी ग्‍लोबल टेंडर काढल्‍याने दोन्‍ही बाजूंकडून संताप व्‍यक्त होत होता. त्‍याविरोधात कंपनीच्‍या प्रवेशव्‍दारावर आंदोलने सुरूच होती. काही दिवसांपूर्वीच पॉस्‍को कंपनीच्‍या गेटवरच दोन्‍ही पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांमध्‍ये राडा झाला होता त्‍यावेळी शिवसेनेचे जिल्‍हाप्रुमख अनिल नवगणे यांनाही धक्‍काबुक्‍की झाली होती.

Exit mobile version