लोकसभेच्या निवडणुकांची चाहुल लागल्यानंतर आता सगळेच पक्ष विविध ठिकाणी सभा घेत आहेत. कोकणातही अशा सभांचा धडाका लागलेला दिसतो. त्यातून एकमेकांवर शाब्दिक वारही केले जात आहेत. नारायण राणे परिवार आणि ठाकरे गट यांच्यातील शाब्दिक युद्धही शिगेला पोहोचले आहे. त्यातूनच चिपळुणात ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि गुहागर येथे सभा घेण्यास चाललेले निलेश राणे यांच्यात संघर्ष झाला. गुहागरला चाललेले निलेश राणे यांच्या ताफ्यावर भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली गेल्याचे समोर आले.
भास्कर जाधव यांनी कणकवली येथील सभेत नारायण राणे आणि त्यांची मुले निलेश तसेच नितेश राणे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर निलेश राणे यांची शुक्रवारी गुहागर या जाधव यांच्या मतदारसंघात सभा होती. त्या सभेसाठी निलेश राणे चिपळुणमार्गे निघाले. त्यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून राणे यांचा ताफा जात असताना ही दगडफेक झाली. त्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
हे ही वाचा:
अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाही
मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!
शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
चिपळुणातून ताफा जाणीवपूर्वक नेला, आपल्या कार्यालयासमोर आपल्याला डिवचण्यासाठी पोस्टर्स लावली असा आरोप जाधव यांनी केला होता. तर तिकडे गुहागर येथील भाषणात निलेश राणे यांनी या दगडफेकीचे उत्तर दिले जाईल, असे आव्हान दिले.