एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

एकनाथ शिंदेंकडून शिवसेना भवनावर दावा?

शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला उभी फूट पडली आहे. त्यानंतर शिवसेनेला गळती लागतच असून अनेक पदाधिकारी, नगरसेवक आता एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आले आहेत. शिवसेनेच्या १२ खासदारांनी काल दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या कडून शिवसेना भवनावर दावा केला जाणार असल्याची माहिती ‘टीव्ही ९’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

मुंबईतील दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय असलेले शिवसेना भवन आहे. आता थेट या भवनावर दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच स्वतःचीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दोन तृतीयांश आमदारांनी बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठींबा देणाऱ्या आमदारांची, नगरसेवकांची, पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हे ही वाचा:

मुंबईच्या माजी आयुक्तांची सीबीआयकडून चौकशी

गायक, गझलकार भूपिंदर सिंह यांचे निधन

संजय राऊतांना का झोंबला ‘सय्यद फंडा‘?

सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले अनेकांना मेल

खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून “असे असल्यास सेना भवनावर दावा सांगणाऱ्यांचे मेंदू तपासून घ्यायला हवेत. उद्या मातोश्रीवरही दावा सांगतील. सत्तेची भांग प्यायलेले काहीही करू शकतात,” अशी टीका त्यांनी केली आहे.

Exit mobile version